Pune News: विनामास्क कारवाईला वेग, दोन दिवसांत पुणे पोलिसांची 1,500 नागरिकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्यात वाढता कोरोना आणि ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क कारवाईला पुन्हा एकदा वेग आला आहे. पुणे पोलिसांनी मागील दोन दिवसांत 1,500 विनामास्क फिरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा डोकं वर काढले असून, तिस-या लाटेचे संकट निर्माण झाले आहे. अशात सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत दिले. त्यानुसार विनामास्क कारवाईला पुन्हा एकदा वेग आला आहे.

पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.05) 391 विनामास्क बाहेर फिरणा-या नागरिकांर कारवाई केली. तसेच गुरूवारी (दि.06) 1,102 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 500 रूपये प्रत्येकी याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.