India Corona Update : गेल्या 24 तासांत 15,144 नवे रुग्ण, 17,170 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – देशभरात मागील 24 तासांत 15 हजार 144 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 17 हजार 170 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या 15 हजारांच्या जवळपास स्थिरावली आहे. 

मागील 24 तासांत झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 05 लाख 57 हजार 985 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 01 लाख 96 हजार 885 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 8 हजार 826 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 181 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 52 हजार 274 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 96.56 टक्के एवढा आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 18 कोटी 65 लाख 44 हजार 868 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 79 हजार 377 नमून्यांची तपासणी शनिवारी (दि.16) करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून दररोज होणा-या चाचण्यांचे प्रमाण दहा लाखांच्या खाली आले आहे.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील एक लाख 91 हजार कोरोना योद्ध्यांना लशीची पहिली मात्रा टोचण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी 5.30 पर्यंत 3 हजार 352 सत्रांमध्ये देशभरातील एक लाख 91 हजार 181 कोरोना योद्ध्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली. लष्करातील 3 हजार 129 डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस टोचण्यात आली.

दरम्यान, कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आज, उद्या (दि.17 ते 18) दोन दिवस महाराष्ट्रातील लसीकरण स्थगित करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.