India Corona Update : चोवीस तासांत 1,549 कोरोना रुग्णांची नोंद, 31 मृत्यू

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 1,549 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झालीय तर, 31 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या 25 हजार 106 अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 30 लाख 09 हजार 390 एवढी झाली असून, त्यापैकी 4 कोटी 24 लाख 67 हजार 774 कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार 652 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.74 टक्के एवढा झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1505744092810018817?s=20&t=5GUt789L6oqLZxKSOcOrRA

कोरोना संसर्गाने देशभरात आजवर 5 लाख 16 हजार 510 रूग्णांचा बळी घेतला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे. देशात आजवर 78 कोटी 30 लाख 45 हजार 157 प्रयोगशाळा नमूने तसापसण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 84 हजार 499 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 181 कोटी 16 लाख 06 हजार 921 जणांना लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 97 कोटी 14 लाख 81 हजार 553 जणांनी पहिला डोस घेतला असून, 81 कोटी 96 लाख 53 हजार 136 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 2 कोटी 04 लाख 72 हजार 232 नागरिकांनी आत्तापर्यंत बचावात्मक लसीचा डोस घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.