Ravet News : सह्याद्री प्रतिष्ठान व एम डी फिटनेस यांच्या शिबिरात 155 दुर्गसेवकांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज : सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर एम डी फिटनेस रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात 155 दुर्गसेवकांनी रक्तदान केले आहे. संजीवनी ब्लड बँक भोसरी यांच्या सहकार्याने रावेत मध्ये रविवारी (दि.3) हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे मार्गदर्शक नंदकिशोर देशमुख, म्हाळुंगेचे सरपंच मयूर भांडे, देहूरोड छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष यदुनाथ डाखोरे व सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्रमिक गोजमगुंडे आदी उपस्थित होते.

राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता दुसऱ्यांदा शिबिराचा आयोजन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात देखील सलग दोन महिने ‘सह्याद्रीचा महासंकल्प – भव्य रक्तदान शिबिर’ या अभियानाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शंभर ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करत तब्बल 10 हजार 233 युनिट रक्त संकलन करण्यात आले. सह्याद्रीच्या रक्तदान महासंकल्पाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा दखल घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.