India Corona Update : गेल्या 24 तासांत 15,590 नवे रुग्ण 191 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशभरात मागील 24 तासांत 15 हजार 590 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या 24 तासांत झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 05 लाख 27 हजार 683 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 01 लाख 62 हजार 738 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यापैकी 15 हजार 975 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 191 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 51 हजार 918 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 96.53 टक्के एवढा आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 18 कोटी 49 लाख 62 हजार 401 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 30 हजार 096 नमून्यांची तपासणी गुरुवारी (दि.14) करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून दररोज होणा-या चाचण्यांचे प्रमाण दहा लाखांच्या खाली आले आहे.

भारतामध्ये उद्यापासून म्हणजेच 16 जानेवारीपासून करोना लसीकरणाला सुरुवात होत आहे. भारतामध्ये करोनाच्या दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.