Pimpri : पिंपरी लोकन्यायालयात 158 खटले निकाली

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.13) पिंपरी येथील न्यायालयात तसेच आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. त्याद्वारे पिंपरी न्यायालयात 158  खटले निकाली काढण्यात आले व रक्कम रुपये 3 कोटी अठ्ठावीस लाखांची वसुली करण्यात आली. तर आकुर्डी मनपा न्यायालयात शास्तीकर, पाणीपट्टी व इतर कर यामधील प्रकरणात तडजोड करून सुमारे रक्कम रुपये 28 कोटींची वसुली करण्यात आली.

या कार्यक्रमात न्यायालयातील मुख्य न्यायाधीश ए.यु. सुपेकरव सह न्यायाधीश एन. टी.भोसले  व सह न्यायाधीश  डी.आर.पठाण  व आर.आर. काळे तसेच सहन्यायाधीश आर एन मुजावर यांच्या उपस्थितीत तर आकुर्डी न्यायालयामध्ये एस. बी. देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून अॅड. विलास कुटे  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.पी. एस. कांबळे होते. यावेळी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, सचिव अॅड. गोरख कुंभार, सहसचिव अॅड. अंकुश एम. गोयल, ऑडीटर अॅड. महेश टेमगिरे व सदस्य अॅड. रामचंद्र बोराटे, पूनम राऊत, अॅड. केशव घोगरे, सुनील रानवडे, निलेश ठोकळ व इतर वकील वर्ग उपस्थित होते.

तर या कार्यक्रमात बोलतांना न्यायालयातील न्यायाधीश डी.आर पठाण यांनी लोकन्यायालयाचे महत्व अधोरेखित केले व बारचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांनी जास्तीत जास्त पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढावेत, असे आवाहन केले.
आजच्या लोकन्यायालयात पॅनल परिक्षक म्हणून अॅड.प्रियंका सुरवसे, अॅड.कल्याणी सोनवणे, अॅड.आम्रपाली दाहत, अॅड. मनिषा महाडीक, अॅड. निता सयाळ, अॅड. पद्मावती पाटील अॅड.माधुरी दाते, अॅड. राजेश रणपिसे, अॅड. दीपक इंगळे, अॅड. विश्वेशवर काळजे, अॅड. सारिका आगळे यांनी काम पाहिले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड.गोरख कुंभार यांनी केले तर आभार अॅड. रामचंद्र बोराटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.