India Corona Update : चोवीस तासांत 15,853 जणांना डिस्चार्ज, देशात 1.51 लाख सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 15 हजार 853 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या देशात 1 लाख 51 हजार 460 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 12 हजार 408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 08 लाख 02 हजार 591 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 04 लाख 96 हजार 308 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
India reports 12,408 new COVID-19 cases, 15,853 discharges, and 120 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,08,02,591
Total discharges: 1,04,96,308
Death toll: 1,54,823
Active cases: 1,51,460Total Vaccination: 49,59,445 pic.twitter.com/wJKda00F8K
— ANI (@ANI) February 5, 2021

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 99 लाख 31 हजार 795 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 15 हजार 776 नमून्यांची तपासणी गुरुवारी (दि.4) करण्यात आली आहे.
COVID-19 Testing Update. For more details visit: https://t.co/FQhg5Mn8Qn @MoHFW_INDIA @DeptHealthRes
#ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/42llmzWlMr— ICMR (@ICMRDELHI) February 5, 2021
गेल्या 24 तासांत देशभरात 120 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 823 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे. तर, रिकव्हरी रेट 97.16 टक्के एवढा झाला आहे. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 49 लाख 59 हजार 445 जणांचे लसीकरण झाले आहे.