Pune Corona Update:1587 नागरिक कोरोनामुक्त, 1978 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू

1587 persons corona free, new 1978 corona patients and 45 deaths.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत. रविवारी (दि. 13 सप्टेंबर) तब्बल 1587  नागरिक या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 770 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1 हजार 978 नवे रुग्ण आढळले. 45 जणांचा मृत्यू झाला. 910 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 440 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 19 हजार 657 रुग्ण झाले आहेत. 99 हजार 76 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 2 हजार 793 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 788 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाचे संकट आणखीनच गंभीर होत चालले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केवळ आठवड्यालाच 1 बैठक न घेता मुक्काम ठोकावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.