लोहगाव विमानतळ विस्तारासाठी हवाई दलाकडून आणखी 16 एकर जागा उपलब्ध

एमपीसी न्यूज – लोहगाव विमानतळाच्या विकासकामांसाठी हवाई आणखी 16 एकर जागा उपलब्ध होणार आहे. यासाठी फेब्रुवारीत हवाई दलाकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोहगाव विमानतळासाठी गत वर्षी हवाई दलाकडून 15. 84 एकर जागा टर्मिनल बिल्डिंग आणि विमान पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी 16 एकर जागेसाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे एकूण 32 एकर (15.84 + 16) जागा उपलब्ध होणार आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.