ताथवडे पुनवळे येथे 16 बांधकामांवर अतिक्रमण कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘ब’ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत  ताथवडे –पुनावळे येथे आज(शुक्रवारी) एकूण 16 बांधकामावर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली.

यामध्ये  ताथवडे – पुनावळे येथील 9 आर.सी.सी. आणि 5 विट बांधकाम व 2 पत्राशेड असे 787 चौमी क्षेत्रावरील एकूण 16 चालू अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली. सदर कारवाई 10 महापालिका पोलीस, 3 जे.सी.बी. मशीन, 1 ट्रक, 2 ट्रॅक्टर, 10 मजूर व 10 कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.

निवडणुकांच्या काळात अनधिकृत बांधकामांचा नागरिकांनी अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला होता. अनेकांनी या काळात आपली पोळी भाजून घेतलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.