Maval Corona Update : मावळ तालुक्यात 16 नवे कोरोना पॉझिटिव्ह

16 corona positive in Maval today; तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 236

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज दिवसभरात साई येथील 09, तळेगाव दाभाडे येथील 04, तर भाजे, बधलवाडी व वडगाव येथील प्रत्येकी 01 असे एकूण 16 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली. तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 236 इतकी झाली आहे.

साई येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील संपर्कात आलेल्या 5 ते 50 वयोगटातील महिला व पुरुष अशा 09 जणांचा रिपोर्ट आज रोजी पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे साई गाव परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

तळेगाव दाभाडे येथील जव्हेरी काॅलनीतील 40 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने व त्याच काॅलनीतील 69 वर्षीय महिला, चैतन्य काॅलनीतील 48 वर्षीय व्यक्ती व कडोलकर काॅलनीतील 65 वर्षीय व्यक्ती यांना लक्षणे जाणवत होती म्हणून स्वॅब घेण्यात आला होता.

आज त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील 10 व्यक्ती आहेत.

भाजे येथील 49 वर्षीय महिलेला दोन दिवस कफाचा त्रास होत असल्याने दि. 10 रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. तिच्या संपर्कातील तीन व्यक्ती आहेत. ही महिला जनरल हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे.

बधलवाडी येथील 60 वर्षीय महिलेला लक्षणे आढळल्याने डाॅ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्या पाॅझिटिव्ह आहेत .

वडगाव येथील टाटा सोसायटीमधील 24 वर्षीय व्यक्ती अगोदर पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आल्याने त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

यामुळे आजपर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 236 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 85 जणांना घरी सोडण्यात आले आहे तर उर्वरित 102 रुग्ण रूग्णालयात आहेत तर स्वगृही विलगीकरण करण्यात आलेले 40 जण आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 61 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 20 जण उपचार घेत आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.