New strain of coronavirus : इंग्लंडवरुन आलेले 16 जण कोरोना बाधित

एमपीसी न्यूज : ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नवीन करोना विषाणूमुळे बाधित झालेला संशयित रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर 25 नोव्हेंबर नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत 1122 प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. यापैकी 16 प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत.

 

कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्ण नागपूरचे, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी तीन रुग्ण, पुण्याचे दोन आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड योथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांता देखील शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या 72 संपर्कातील व्यक्तींपैकी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.