Pimpri: पालिका स्थायीची 16 कोटीच्या विकास कामांना मंजुरी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 16 कोटी 42 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील विधवा व घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अर्थ सहाय्यामध्ये वाढ करून ती दहा हजार प्रति लाभार्थी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र होणारे अर्ज यांचा विचार करता या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे आवश्यक असून त्याकामी सुमारे एक कोटी 50  लाख रूपये इतकी खर्चासाठी तरतूद वर्गीकरण करणेस स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पर्यावरण अभियांत्रिकी विभीगाकडील मैलाशुध्दीकरण केंद्रे व पंपीग स्टेशनमध्ये ऊर्जा निर्मितीकामी सोलर सिस्टीम बसविणेकामी येणा-या सुमारे 66 लाख 37 हजार रुपयांच्या खर्चास,  वायसीएम रूग्णालयात दोन वर्षासाठी सीपीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी साडेचार प्रतीवर्ष इतके शुल्क आकारणी करण्यास तसेच महानगरपालिकेच्या आस्थापनावरील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अभ्यासक्रमासाठी कुठलेही शुल्क न आकारता, नऊ लाख रूपयांचा पाच वर्षाचा बाँण्ड लिहून घेण्यास मान्यता देण्यात आली.

पाणीपुरवठा विभागाकडील जलशुध्दीकरण केंद्र से.23 करीता 216  मेट्रीक टन द्रवरूप पॉली क्लोराईड खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 69 लाख 42 हजार रुपयांच्या खर्चास,  सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविणेकामी येणा-या सुमारे 27 लाख 8 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 20 कासारवाडी येथे विद्याविकास शाळेजवळ सुलभ शौचालय बांधणेसाठी येणा-या सुमारे 93 लाख 94 हजार रुपयांच्या खर्चास कासारवाडी येथे जुन्या मुंबई पुणे हायवे जवळ सुलभ शौचालय बांधणेसाठी येणा-
या सुमारे 59 लाख 63  हजार रुपयांच्या यासह एकूण 16 कोटी 42 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.