Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 16 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 24) 16 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तर एका ठिकाणी झाड पडण्याची घटना घडली. मागील दोन दिवसात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणी साचून त्या घर, सोसायटीमध्ये शिरण्याच्या या घटना घडल्या आहेत.
पाणी शिरण्याच्या घटनांसह आज (बुधवारी) पहाटे पावणेपाचच्या सुमारास पिंपरीमधील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागील बाजूला एक झाड पडल्याची घटना घडली. या सर्व घटनांची वेळोवेळी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे घेतली. तर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते.
कुठे, केंव्हा शिरले पाणी
# 10.30 – लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी
# 10.40 – चिंचवड स्टेशन (अण्णा बनसोडे यांच्या निवास्थानाजवळ)
# 10.45 – राधानगरी विरंगुळा शेजारी, दिघी रोड
# 10.55 – रामनगर सोसायटी, युवराज हॉटेल, भोसरी
# 11.05 – श्रीराम कॉलनी पोलीस स्टेशन, आदर्श कॉलनी, वाकड

# 11.10 – आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी
# 11.15 – कृष्णा सोसायटी, दिघी पोलीस चौकीजवळ
# 11.20 – गणेश कॉलनी नंबर आठ, बोपखेल
# 11.25 – लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी
# 11.27 – वायसीएमच्या मागे फुलेनगर झोपडपट्टी, मशीद जवळ
# 11.30 – आदिनाथ नगर, हिंदी मीडियम स्कूल, भोसरी
# 11.33 – आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी
# 11.40 – आदिनाथ नगर पेट्रोल पंप, भोसरी. पुणे-नाशिक महामार्गावर
# 12.15 – खराळवाडी, माताजी मंदिर
# 12.18 – मोहन नगर, शेलार चाळ, चिंचवड. संतोषी माता मंदिर, ईएसआय हॉस्पिटल
# 08.15 – दिघी आदर्शनगर, मंजीरीबाई शाळा, मोरया कॉलनी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.