Pune : नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 16 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – मुलीला पुण्यातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची तब्बल 16 लाखांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका 35 वर्षीय पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीला तुमच्या मुलीला पुण्यातील नामांकीत महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले. तसेच एका टेंडरसाठी 1 लाख 35 हजार रुपये घेतले. मात्र, मुलीचे प्रवेश न मिळवून देता तसेच त्यांची रक्कम परत न करता फिर्यादी यांची 16 लाख 35 हजार रुपयांना फसवणूक केली.

विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.