Chakan News : खेड मध्ये नवे १६ कोरोना रुग्ण ; २ मृत्यू ; १७ डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शनिवारी (दि. 18 सप्टेंबर ) 8 गावे आणि 2 पालिकांमध्ये 16 रुग्ण मिळून आले आहेत.  तर 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वरचीभांबुरवाडी येथील 90 वर्षीय महिलेचा सुश्रुत हॉस्पिटल येथे गुरुवारी ( दि. 16 सप्टेंबर) मृत्यू झाला असून गुळाणी येथील 91 वर्षीय पुरुषाचा सी सी सी अवसरी येथे शुक्रवारी ( दि. 17 सप्टेंबर) मृत्यू झाला असल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 35 हजार 51 झाला आहे. यापैकी 34 हजार 169 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. शनिवारी दिवसभरात 17 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 303रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 2 मृत्यूने 579 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 11 रुग्ण, चाकण 0, आळंदी 2, राजगुरुनगर 3 असे एकुण 16 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे चऱ्होली खु. , होलेवाडी ,जरेवाडी,कडूस , खराबवाडी ,रेटवडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. बिरदवडी मध्ये 2 आणि  वाकी बु. येथे 3 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.