23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Shivsena : बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांकडे आहेत केवळ 48 तास; नंतर शिवसेनेचे दार होणार बंद

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे बंडखोरी (Shivsena) करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरूनच आता 16 आमदारांना पुढच्या 48 तासांच्या आत म्हणजेच सोमवारपर्यंत त्यांचे मत मांडण्याचे सांगितले आहे. जर त्यांनी आपले मत मागितले नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. आजपासून सर्वांना नोटिस जातील अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

CM Uddhav Thackeray: राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या सर्व बंडखोर आमदारांसाठी आपले दार बंद केले आहे. शिवसेनेने १६ आमदाराना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर काल रात्री चर्चा झाली. महाधिवक्ता, नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांनी बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केला. अरविंद सांवत म्हणाले, कि जर या आमदारांनी उत्तर दिले नाही, तर त्यांना काढून टाकण्यात येईल. कारवाई करण्यात येईल. त्यांनतर शिवसेनेची (Shivsena) दार पूर्णपणे बंद होतील. त्यांच्याकडे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यांच्याकडे दोन दिवस आहेत.

spot_img
Latest news
Related news