Pune News : 1634 आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेसह खासगी रुग्णालयांतील 1634 फ्रंट लाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

देेशव्यापी लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्पा संपून दुसरा टप्पा सुरू झाला. यामध्ये पुणे शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यातील कोथरूड सुतार हॉस्पिटल 90, कमला नेहरू हॉस्पिटल 100, केईएम हॉस्पिटल 77, ससून हॉस्पिटल 137, येरवडा राजीव गांधी हॉस्पिटल 36, जोशी हॉस्पिटल 121, रूबी हॉल 200, बुधरानी इनलेक्स 20, जहांगिर हॉस्पिटल 160 , दिनानाथ मंगेशकर रुग्णालय 179, नोबेल हॉस्पिटल 41, भारती हॉस्पिटल 43, भारती आयुर्वेद 13, विल्लु  पुनावाला 22, सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता 49, सह्याद्री हॉस्पिटल हडपसर 21, सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन 59, पुना हॉस्पिटल 44, ज्युपिटर हॉस्पिटल 77, श्री हॉस्पिटल 19, रूबी हॉल वानवडी 77, इनामदार रुग्णालय 49 अशा एकूण 1634 फ्रंट लाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.