India Corona Update : धोका वाढतोय ! गेल्या 24 तासांत देशात 16,577 नवे रुग्ण, 120 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्ण वाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला होता. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत असून, गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 577 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत अधिक नव्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. 

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 63 हजार 491 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 07 लाख 50 हजार 680 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांत देशभरात 12 हजार 179 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 21 कोटी 46 लाख 61 हजार 465 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 31 हजार 807 नमून्यांची तपासणी गुरुवारी (दि.25) करण्यात आली आहे.

सध्याच्या घडीला देशात 1 लाख 55 हजार 986 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 120 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 56 हजार 825 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.24 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 72 हजार 643 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.