India Corona Update : देशात 1,67,695 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक 

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असून, सध्या देशात 1 लाख 67 हजार 695 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी केरळमध्ये 77 हजार 964 तर, महाराष्ट्रात 23 हजार 894 रुग्ण आहेत. दुसरीकडे गेल्या 24 तासांत 14 हजार 306 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 18 हजार 762 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 41 लाख 89 हजार 774 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 35 लाख 67 हजार 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.16 टक्के एवढा झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 443 रुग्ण दगावले असून, आजवर 4 लाख 54 हजार 712 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 60.07 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 102.27 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून, सध्या देशात उपचाराधीन असलेली रुग्ण संख्या 239 दिवसांतील निच्चांकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.