India Corona Update : गेल्या 24 तासांत 16,838 नवे रुग्ण, 13,819 जणांना डिस्चार्ज 

1.80 कोटी लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 838 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 13 हजार 819 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 11 लाख 73 हजार 761 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 08 लाख 39 हजार 894 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 13 हजार 819 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 1 लाख 76 हजार 319 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 21 कोटी 99 लाख 40 हजार 742 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 61 हजार 834 चाचण्या गुरुवारी (दि.4) रोजी करण्यात आल्या आहेत.

 

गेल्या 24 तासांत देशात 113 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 548 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.07 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 80 लाख 05 हजार 503 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. मागील 24 तासांत देशभरात उच्चांकी 13 लाख 88 हजार 170 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.