तळेगावमध्ये 17 मार्चला फेस पेंटिग स्पर्धा

एमपीसी न्यूज – तळेगावमध्ये कलापिनी कला केंद्राच्या वतीने फेस पेंटिग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 17 मार्चला घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा 5 वी ते 10वी तील विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी ठेवण्यात आली आहे. तसेच 17 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत होणार आहे.

यामध्ये स्पर्धकांनी रंगवण्याचे सर्व साहित्य आणायचे आहे, तसेच या स्पर्धेचे शुल्क 50 रू. स्पर्धेच्या अर्धा तास आधी जमा करावेत. तसेच चेहरा रंगवण्यासाठी जोडीदाराची व्यवस्था स्पर्धकाने स्वतः करायची आहे. यात आकर्षक रंगसंगती व नवीन कल्पनांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सहभागी झाल्याचे प्रमाणपत्रे दिली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.