Pune : विम्याची तब्बल 17 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – खाजगी लाईफ इन्शूरन्स कंपनीचे संचालक, सीईओ व सीएफओ यांनी महिलेची 17 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी उज्वल कुटे(रा. प्रभात रोड, डेक्कन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नामांकित खाजगी लाईफ इन्शूरन्स कंपनीचे संचालक, सीईओ व सीएफओ यांनी मिळून फिर्यादीच्या फंड ट्रान्सफर फॉर्मवर सह्या घेतल्या व तुमच्या खात्यावर पॉलिसीचे पैसे जमा करतो असे सांगितले. परंतु असे न करता फिर्यादीच्या संमतिशिवाय नवी पॉलिसी इशु करून या पॉलिसीमधून त्यांची 17 लाखांची फसवणूक केली.
याप्रकरणी पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.