Pimpri : कोयत्याच्या धाकाने 18 लाख लुटले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 18 लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना सांगवी येथे घडली.

दुधाराम भैराराम देवासी (वय 27, रा. मारूंजी, ता. मुळशी) यांनी गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन दुचाकीवरील पाच चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबरला सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास देवासी हे मार्केटयार्ड येथे 18 लाखांची रोकड घेऊन चालले होते. ते सांगवी येथील राजीव गांधी पुलाजवळ आले असता दोन दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यांनी देवासी यांना कोयत्याचा धाक दाखविला.

देवासी यांच्याकडील 18 लाखांची रोकड व दुचाकीची चावी, असा ऐवज लुटून आरोपी पुण्याच्या दिशेने पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.