Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 18 रुग्णांची नोंद, 5 जणांना डिस्चार्ज, एक मृत्यू

काल, बुधवारी सिद्धिविनायक नगरी येथील 50  वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसीन्यूज : गेल्या काही दिवसांपासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत होते. मात्र, आज ( गुरुवारी ) मिळालेल्या आकडेवारीनुसार हद्दीत पुन्हा रुग्णवाढ नोंदविण्यात आली. आज, विविध भागात मिळून 18 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, काल, बुधवारी सिद्धिविनायक नगरी येथील 50  वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीतील थॉमस कॉलनी येथे 3, किन्हई, शेलारवाडी, इंद्रपूरम, पोर्टर चाळ येथे प्रत्येकी 2 तर दत्तनगर, शितलानगर नं. 2, श्रीकृष्ण नगर, मामुर्डी, कुंडमळा, मेन बाजार आणि पारशी चाळ येथे प्रत्येकी एक अशा एकूण 18 नवीन रुग्णांची भर पडली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 860 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत18 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 860 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज, 5 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 686 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

यापैकी सध्या 26 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. आयसोलेशनमध्ये 98 रुग्ण आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 37 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 27 आणि हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. हिंजवडी येथील विप्रो कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

80 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, काल, बुधवारी सिद्धिविनायक नगरी येथील 50 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 23 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.