Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत १८ संघांचा सहभाग !!

नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअमवर सोमवारी स्पर्धेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत पुणे शहरातील १८ संघ सहभागी होत असून ही स्पर्धा आजपासून (६ मे) मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू होत आहे.

हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेखाली होणारी ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी यांनी आयोजित केली आहे. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना १२ मे पासून होणार आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना करंडक आणि रोख पारीतोषिके मिळणार आहे. तसेच स्पर्धेतील उपविजेत्या संघाला आणि तिसर्‍या क्रमांकाच्या संघाला करंडक आणि रोख पारितोषिक मिळणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी सहा सामने होणार आहेत.

स्पर्धेतील आजचे सामने (६ मे)ःविक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी ब विरूध्द सुपर इलेव्हन- सकाळी १०;राजा बांगला विरूध्द किड्स इलेव्हन- सकाळी ११:इनकम टॅक्स् विरूध्द हॉकी लव्हर्स- दुपारी १२:प्रियदशर्नी एससी विरूध्द फ्रेन्डस् युनियन- दुपारी १:ग्रीन मेडोज् विरूध्द हॉकी युनायटेड- दुपारी ३;पीसीएमसी विरूध्द पुणे सिटी लाईन बॉईज- दुपारी ४:

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.