PM-Kisan : 25 डिसेंबरला पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार

९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा होणार

एमपीसी न्यूज : हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर नवीन कृषी कायद्यांचा निषेध करत आहेत. त्याच दरम्यान आता २५ डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधणार आहेत आणि त्याचवेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) (पीएम किसान योजना)चा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा होणार  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये पीएम-किसान योजनेचा पहिला हप्ता जाहीर केला होता. त्यानंतर आता या हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत. २५ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बटन दाबून शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता हस्तांतरित करतील.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. पीएम-किसान आणि शेतकरी कल्याणासाठीच्या सरकारच्या विविध उपक्रमांबाबत शेतकरी आपले अनुभव कथन करतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण सुद्धा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमा दरम्यान पीएम-किसान योजना आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेल्या महत्वाच्या योजनांच्या बाबत शेतकरी आपले अनुभव सांगतील. या कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. तीन हप्त्यांत २००० रुपये दर चार महिन्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.