Pune: कोरोनाचे 1812 रुग्ण, 764 जणांना डिस्चार्ज, 17 जणांचा मृत्यू

1812 new Corona patients, 764 persons discharged and 17 deaths.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या गुरुवारी 6 हजार 582 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1812 रुग्ण आढळले. ही रुग्णवाढ आजपर्यंतची सर्वाधिक आहे. कोरोनाच्या टेस्ट वाढविण्यात आल्याने रुग्णवाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

764 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 17 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला.

कोरोनाचे पुणे शहरात 31 हजार 884 रुग्ण झाले आहेत. तर, 20 हजार 334 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

536 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 80 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 906 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे शहरात आता 10 हजार 644 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

कर्वेनगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 66 वर्षीय पुरुषाचा D. H. औंध रुग्णालयात, धानोरी गावठाणात 64 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, नवी पेठेतील 51 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, कसबा पेठेतील 83 वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात, शिवाजीनगरमधील 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

तर बाणेरमधील 75 वर्षीय महिलेचा, सिंहगड रोडवरील 53 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 40 वर्षीय पुरुषाचा, लोहगावमधील 85 वर्षीय पुरुषाचा, शुक्रवार पेठेतील 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

धनकवडीतील 72 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 61 वर्षीय महिलेचा रत्ना हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 66 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, एरंडवनेतील 70 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 53 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 75 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.