India Corona Update : गेल्या 24 तासांत 18,711 नवे रुग्ण ; महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब या राज्यात रूग्ण वाढीचा वेग अधिक

एमपीसी न्यूज – देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत 18 हजार 711 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 100 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे देशातील महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यात रूग्ण वाढीचा वेग अधिक आहे. गेल्या 24 तासांत वाढलेल्या रूग्णांपैकी 84.71 टक्के रूग्ण या सहा राज्यातील आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 12 लाख 10 हजार 799 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 08 लाख 68 हजार 520 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 14 हजार 392 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 1 लाख 84 हजार 523 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 14 लाख 30 हजार 507 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 37 हजार 830 चाचण्या शनिवारी (दि. 6) करण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 100 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 756 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. देशातील 20 राज्य आणि केद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासांत एकही कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 97.07 टक्क्यांवर पोहोचला आहे.

  दोन कोटी लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 09 लाख 22 हजार 344 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. 1 मार्चपासून देशातील 60 वर्षावरील सर्वांना तर 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.