India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत 18,855 नवे रुग्ण, 163 मृत्यू 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 18 हजार 855 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 163 जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशात आतापर्यंत 29 लाखांहून अधिक जणांना लस टोचण्यात आली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 07 लाख 20 हजार 048 एवढी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 71 हजार 686 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 3 लाख 94 हजार 352 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 50 लाख 81 हजार 079 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 42 हजार 306 नमून्यांची तपासणी गुरुवारी (दि.28) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 163 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 010 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌.

गेल्या 24 तासांत देशभरात 20 हजार 746 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, देशाचा रिकव्हरी रेट 96.81 टक्के एवढा झाला आहे. देशात आतापर्यंत 29 लाख 28 हजार 053 जणांचे लसीकरण झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.