India Corona Update : चोवीस तासांत 18,943 कोरोना रुग्ण, 209 दिवसातील निचांकी
एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात 18 हजार 943 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 8 हजार 850 रुग्ण एकट्या केरळमध्ये वाढले आहेत. देशात झालेली रुग्णवाढ मागील 209 दिवसातील निचांकी आहे. गेल्या 24 तासांत 29 हजार 639 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 38 लाख 53 हजार 048 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 31 लाख 50 हजार 886 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.93 टक्के एवढा झाला आहे.
COVID19 | India reports 18,346 new cases in the last 24 hours; lowest in 209 days; Active caseload stands at 2,52,902. Recovery rate currently at 97.93%: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/YImT23Ekqp
— ANI (@ANI) October 5, 2021
देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या देशात 2 लाख 52 हजार 902 ॲक्टिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशात 263 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 49 हजार 260 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 57 कोटी 53 लाख 94 हजार 042 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 11 लाख 41 हजार 642 नमूने तपासण्यात आले आहेत.
COVID-19 Testing Update. For more details visit: https://t.co/dI1pqvXAsZ @MoHFW_INDIA @DeptHealthRes @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/F2KjaquXi6
— ICMR (@ICMRDELHI) October 5, 2021
भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 91 कोटी 54 लाख 65 हजार 826 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 72.51 जणांनी लस घेतली आहे.