Smart City : स्मार्ट सिटीची 18 वी बैठक, पोलीस आयुक्तांची संचालकपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज –  पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची (Smart City) 18 वी बैठक अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल)  नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. तसेच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील, नामनिर्देशक संचालक ममता बत्रा, स्वतंत्र संचालक यशवंत भावे, प्रदीपकुमार भार्गव, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार, महाव्यवस्थापक  अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह अधिकारी तसेच सल्लागार प्रतिनिधी उपस्थ‍ित होते.

Todays Horoscope 21 June 2022: जाणून घ्या आजचे राशीफळ

 

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची संचालक तर  किरणराज यादव यांची सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवडीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत  (Smart City) सुरु असलेल्या स्मार्ट सारथी ऍप व सिटी इंगेजमेंट हा प्रकल्प पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या ओएफसी प्रकल्पासाठी क्रिएशन्स इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांची डक्ट पुरविणे आणि टाकण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.

 

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील राजीव गांधी पुल ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या फुटपाथ कामकाजासाठी निखील कन्स्ट्रक्शन ग्रूप प्रा.लि. यांच्या नेमणुकीच्या विषयास मान्यता देण्यात आली. तसेच, या प्रकल्पासाठी मे. इन्व्हीरोसेफ कन्स्लटंट यांची प्रकल्प सल्लागार म्हणून निवडीबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  प्रकल्प सल्लागार यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यावर संचालक मंडळाद्वारे चर्चा होवून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.