शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पार्सातर्फे 19 मार्चला रंगणार दुचाकीवरून सिंहगड चढण्याच्या स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन अॅण्ड सोशल अॅक्टिव्हिटी, (पार्सा)ने, फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या मान्यतेने येत्या 19 मार्च रोजी दुचाकी (बाईक) वरून सिंहगड किल्ला चढण्याची स्पर्धा आयोजित केली आहे, अशी माहिती आयोजिका रेश्मा ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही स्पर्धा 19 मार्चला सकाळी 6.30 ते 10 या वेळेत होणार आहे. यामध्ये तीन गट केले असून एक गट हा 55 वर्षापुढील नागरिकांसाठी तर बाकीचे दोन गट महिला आणि पुरुष असे सर्वसाधारणसाठीचे आहेत. स्पर्धेमध्ये 100 सीसीपासून ते 350 सीसी क्षमतेच्या बाईक आणि स्कूटर सहभागी होणार असून गाडयांच्या विविध प्रकारांमध्ये सुद्धा गट पाडण्यात आले असल्याचेही रेश्मा ललवाणी यांनी सांगितले.

सिंहगड  किल्ल्याकडे जाताना लागणाऱ्या गोळेवाडी टोल नाक्यापासून सकाळी 6.30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या तुळई उद्यानपर्यंतचा मार्ग हा स्पर्धेचा असणार आहे. हे अंतर जवळजवळ 4.5 किलोमीटर इतके आहे. स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी दर 50 फुटांवर मार्शल्स तसेच 3 रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाडया स्पर्धेच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सहभागासाठीचे प्रमाणपत्र तसेच विजेत्यांसाठी ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात येणार असल्याचे ललवाणी यांनी सांगितले.

स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख 14 मार्च आहे. दि. 16 आणि 17 मार्चला स्पर्धकांसाठी सराव आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक स्पर्धकाची दुचाकी ही स्पर्धेच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाणार असून स्पर्धेसाठी योग्य असलेल्या वाहनाच्या चालकालाच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेची प्रवेशिका व सविस्तर माहिती www.parasaracing.com वर उपलब्ध आहे. इच्छुक स्पर्धक आपल्या प्रवेशिका 457 / 458 शॉप नंबर – 2, शिवदर्शन चेम्बर्स, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे -4110377 येथे पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी रेश्मा ललवाणी (9404857677) यांच्याकडे संपर्क साधावा.

spot_img
Latest news
Related news