१९ डिसेंबर : दिनविशेष

What Happened on December 19, What happened on this day in history, December 19. See what historical events occurred, which famous people were born and who died on December 19.

१९ डिसेंबर : दिनविशेष – गोआ मुक्ती दिन

१९ डिसेंबर – महत्वाच्या घटना

  • १९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

    १९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.

    १९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

    १९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

    १९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.

    २००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९ डिसेंबर – जन्म

  • १८५२: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९३१)

    १८९४: पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९८०)

    १८९९: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४)

    १९०६: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)

    १९१९: चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९)

    १९३४: भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म.

    १९६६: भारतीय क्रिकेटपटू राजेश चौहान यांचा जन्म.

    १९६९: भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म.

    १९७४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज रिकी पॉन्टिंग यांचा जन्म.

१९ डिसेंबर – मृत्यू

  • १८४८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८१८)

    १८६०: भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८१२)

    १९१५: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६४)

    १९२७: क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९७)

    १९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)

    १९९७: स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र बारलिंगे यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

    १९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)

    १९९८: भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे यांचे निधन.

    १९९९: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचे निधन. (जन्म: २४ मे १९३३)

    २०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.