Pimpri : जुगार खेळणा-या 19 जणांना अटक

19 gamblers arrested from Pimpri area.

एमपीसी न्यूज – लालटोपीनगर, पिंपरी येथे एका जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये 85 हजारांचा ऐवज जप्त करत पोलिसांनी 19 जणांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 12) दुपारी करण्यात आली.

विनय कुमार उर्फ पाल्या राम सहजीवन कुर्मी (वय 36, रा. लालटोपीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या मटका चालक मालकाचे नाव आहे. त्याच्यासह अन्य 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनय हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या कल्याण मटका घेत होता. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली.

लालटोपीनगर येथील सर्कस मैदानावर असलेल्या एका झाडाखाली हा मटका सुरु होता. पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीन वाजता या जुगार अड्ड्यावर छापा मारला.

पोलिसांनी रोख रक्कम, मोबईल फोन, पेन, कल्याण मटका साहित्य असे एकूण 85 हजार 390 रुपयांचे साहित्य जप्त केले. तसेच मटका चालकासह मटका खेळणा-या 19 जणांना अटक केली. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ), साथीचा रोग अधिनियम 1897 कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 50 (ब), महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.