Pune News : पिस्टल बाळगणारा 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज : दत्तवाडी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला तावरे कॉलनी येथील अरण्येश्वर मंदिराजवळून ताब्यात घेतले. या तरुणाने केवळ दहशत माजवण्यासाठी पिस्टल आणि धारधार हत्यार जवळ बाळगले होते.  सिद्धार्थ विजय गायकवाड (वय 19, अण्णा भाऊ साठे नगर, सहकारनगर) असे या तरुणाचे नाव आहे दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

दत्तवाडी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तावरे कॉलनीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक तरुण बंदूक आणि पालघर सारखे हत्यार घेऊन कोणाची तरी वाट पाहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अरनेश्वर कमानीजवळून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता पोलिसांना एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पालघर सारखे धारदार हत्यार आढळले.

आरोपी तनु हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मारामारी करणे, भांडण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. हे पिस्तूल त्याने कुठून आणि कशासाठी आणले होते याचा तपास दत्तवाडी पोलिस करीत आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.