Wakad : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

एमपीसी न्यूज – घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत नात्यातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी 16 वर्षीय पीडित मुलीने सोमवारी (दि. 2) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 19 वर्षीय तरुणावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या नात्यातील आहे. त्याने पीडित मुलीच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.