Chakan News : 63 लाख रुपये किंमतीचा 197 किलो गांजा जप्त, एकाला अटक 

एमपीसी न्यूज – 63 लाख 34 हजार 475 रुपये किंमतीचा 197 किलो 781 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. चाकण शिक्रापूर रोडवर, मोहितेवाडी, खेड येथे शुक्रवारी (दि.01) सकाळी 11.15 वा ही कारवाई केली. 

गोकुळ शिवाजी आगे (वय 28, रा. किट्टी आडगाव, माजलगाव, बीड), अरुण जग्गनाथ मोहिते (रा. शेलपिंपळगाव, खेड) आणि ज्ञानेश्वर उत्तम मोहिते (रा. शिरगाव रोड, सोमाटणे फाटा, मावळ) या तिघांविरुद्ध NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आरोपी गोकुळ शिवाजी आगे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोकुळ आगे आयसर ट्रक मधून 197 किलो 781 ग्रॅम गांजाची वाहतूक करताना आढळून आला. आरोपी अरुण मोहिते आणि ज्ञानेश्वर मोहिते यांनी गांजा दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एक आरोपीला अटक केली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.