Pune : गौरी पाहायला गेले आणि लक्ष्मी गमावून बसले! 

एमपीसी न्यूज – गौरी जेवणासाठी मैत्रीणीच्या घरी बंगल्याला कुलूप लावून गेलेल्या महिलेच्या घरी घरफोडी करून चोरट्याने 2 लाख 25 हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना काल (दि.16) दुपारी दोनच्या सुमारास कर्वेनगर येथे घडली. याप्रकरणी राहुल गंधे (वय 42, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीकडे गौरी जेवणासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या कर्वेनगरमधील बंगल्याला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने
बंगल्या्च्या बेडरूमचे खिडकीचे ग्रील कापून घरात प्रवेश करून कपाटातील तब्बल 2 लाख 25 हजारांचे सोन्या-हि-यांचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. याप्रकरणी पुढील तपास अलंकार पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.