Pimple-Gurav News : परस्पर बँक खात्यातून अडीच लाख ट्रान्सफर
एमपीसी न्यूज – कोणतीही माहिती शेअर न करता एका व्यक्तीच्या बँक खात्यातून दोन लाख 59 हजार 850 रुपये काही बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. (Pimple-Gurav News) याप्रकरणी संबंधित बँक खाते धारक आणि अज्ञाताच्या विरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.
शरद भीमराव पवार (वय 49, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 6) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Crime News : पोलंड वरून आलेले गिफ्ट पडले साडे 11 लाख रूपयांना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या बँक खात्यातून दोन लाख 59 हजार 850 रुपये त्यांना कोणतीही माहिती न देता इतर बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. (Pimple-Gurav News) दरम्यान, पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती कोणाशीही शेअर केली नाही. तसेच त्यांना कुठला ओटीपी, कॉल, मेसेज देखील आला नाही. असे असताना देखील पैसे ट्रान्सफर झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.