India Corona Update : चोवीस तासांत 2.58 लाख नवे रुग्ण, 1.51 लाख जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 58 हजार 089 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1 लाख 51 हजार 740 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढून 19.65 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 73 लाख 80 हजार 253 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 52 लाख 37 हजार 461 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 94.27 टक्के एवढा झाला आहे.

सध्याच्या घडीला देशात 16 लाख 56 हजार 341 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 385 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 86 हजार 451 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.30 टक्के एवढा झाला आहे. ‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 70.37 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम अंतर्गत आजवर 157.20 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

ओमायक्रॉन अपडेट

देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 209 एवढी झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील 1,738, पश्चिम बंगाल 1,672 आणि राजस्थान मधील 1,276 रुग्ण आहेत. 3 हजार 109 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.