India Corona Update : चोवीस तासांत 2.64 लाख नवे कोरोना रुग्ण ; महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक 

एमपीसी न्यूज – भारतात तब्बल सात महिन्यानंतर मोठ्या प्रमाणावर नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 64 हजार 202 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 753 एवढी झाली आहे. 

 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 65 लाख 82 हजार 129 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 48 लाख 24 हजार 706 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 09 हजार 345 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या देशात 12 लाख 72 हजार 073 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 315 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 85 हजार 350 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे. तर रिकव्हरी रेट 95.20 टक्के एवढा आहे.

‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 69.90 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम अंतर्गत आजवर 155.39 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

चिंताजनक बाब म्हणजे देशातील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 14.78 टक्के एवढा झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 11.83 टक्के एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.