India Corona Update : चोवीस तासांत 2.68 लाख नवे कोरोना रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट 16.66 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 68 हजार 833 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्हीटी रेट वाढून 16.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 041 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 68 लाख 50 हजार 962 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 49 लाख 47 हजार 390 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 22 हजार 668 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या देशात 14 लाख 17 हजार 820 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 402 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 85 हजार 782 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.31 टक्के एवढा झाला आहे. तर रिकव्हरी रेट 94.83 टक्के एवढा आहे.

‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 70.07 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम अंतर्गत आजवर 156.02 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.