Pune : लोक अदालतीमध्ये १ कोटी ४० लाख वसूल

एमपीसी न्यूज – विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय यांच्या वतीने पुणे महापालिका न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. पाणीपुरवठा विभागाची ४०९ पाणीपट्टी प्रकरणे निकाली निघाली.

थकबाकीपोटी १ कोटी ३३ लाख व मालमत्ता विभागाच्या थकबाकीदार यांचेकडून वसुलीपोटी रक्कम रुपये ७ लाख वसूल झाले. तसेच यावेळी ५ दावेही निकाली निघाले. मालमत्ता विभागाचे १२८ प्रकरणात नोटिसा देण्यातआलेल्या होत्या. यापैकी ४७ प्रकरणे निकाली निघाल्याचे ऍड,मंजुषा इधाते यांनी कळविले आहे.

लोक अदालतमध्ये सिव्हील जज्ज सिनियर डिव्हिजन न्यायाधीश खांदेबहाल, पुणे मनपा न्यायालय न्यायाधीश, तहसीलदार प्रियंका धुमाळ, विधी विभागाचे प्रमुख ऍड,रवींद्र थोरात, ऍड मंजुषा इधाते, पॅनेलवरील  वकील तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, विशाल हरिभक्त, आशिष जाधव, पाणीपुरवठा विभागातील पाणी मीटर रीडर कर्मचारी व संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.