Pune : शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठी 2 कोटी : स्थायी समिती अध्यक्ष, सुनील कांबळे यांची माहिती

एमपीसी न्यूज – शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठी दोन कोटी रुपये वर्गीकरण करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकारांना दिली.

पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यात राहणाऱ्या, दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्डधारकांना, वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. पुणे महापालिकेने प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलकडून सीजीयमच्या मान्य दराने उपचार करण्यात येतात. त्यासाठी आवश्यक असणारा 50 टक्के खर्च पुणे महापालिकेमार्फत हॉस्पिटलला अदा करण्यात येतात.

एका कुटुंबासाठी एका वर्षासाठी एक लाख रुपये पर्यंतची मर्यादा या योजनेमार्फत आहे. दि. 1 एप्रिल ते 31 मार्च 2020 या सालासाठी 20 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2019 अखेर 15 हजार 751 इतके कार्डधारक करण्यात येऊन एकूण हमीपत्र 15 हजार 920 इतके देण्यात आल्याने हॉस्पिटलकडून आलेल्या बिलाअंती ही तरतूद संपुष्टात आली आहे.

चालू आर्थिक वर्षातील दि. 1 डिसेंबर ते 31 मार्च 2020 अखेर होणाऱ्या कार्डधारकांची संख्या व या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या 50 टक्के वर्षाचे हमीपत्र पाहता अंदाजे 2 कोटी रुपये वर्गीकरण करण्यात आले. तर, पुणे महापालिकेच्या माजी सभासदांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 39 लाख रुपये वर्गीकरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.