BNR-HDR-TOP-Mobile

Hadapsar : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून 2 लाखांचा ऐवज लंपास

85
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून चोरट्यानी तब्बल 2 लाखाच्या मालावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 5 डिसेंबर 2018 ते 13 डिसेंबर या कालावधीत भेकराईनगर येथील जय महाराष्ट्र मोबाईल शॉपीमध्ये घडली आहे.

याप्रकरणी रमेश चौधरी (वय 29, रा. धुमाळवाडी, फुरसुंगी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी रमेश चौधरी यांचे मोबाईल शॉपी हे कुलूप लावून बंद होते. चोरट्यानी संधी साधून त्यांच्या मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून दुकानात प्रवेश केला. त्या दुकानातील दुरुस्तीला आलेले तसेच नवीन मोबाईल, ब्लुटूथ, मेमरी कार्ड्स, मोबाईल बॅटरिझ असा तब्बल 2 लाख रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.