Pune : पुणे विभागातील 2 लाख 47 हजार 50 पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे पदवीधर मतदार संघात 57.96 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदान मंगळवारी (दि. 1) पार पडले. पुणे विभाग पदवीधर मतदार संघात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातील कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान (68.09 टक्के) झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी (44.95 टक्के) मतदान झाले. दिवसभरात एकूण मतदान 57.96 टक्के झाले. 2 लाख 47 हजार 50 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 8.52 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात (दहा ते बारा) 10.92 टक्के मतदान झाले. नंतरच्या दोन तासात (दुपारी 12 ते 2) 17.66 टक्के मतदान झाले. दिवसभरात एकूण 57.96 टक्के मतदान झाले.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 371 पुरुष तर 1 लाख 34 हजार 854 महिला मतदार आहेत. त्याचबरोबर 32 तृतीयपंथी पदवीधर मतदार आहेत. यातील 1 लाख 80 हजार 95 पुरुष तर 66 हजार 953 महिला मतदारांनी दिवसभरात मतदान केले. एकूण 4 लाख 28 हजार 257 पदवीधर मतदारांपैकी 2 लाख 47 हजार 50 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

जिल्हावार झालेले मतदान –

_MPC_DIR_MPU_II

पुणे (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 89626 – 42781
महिला – 46958 – 18621
तृतीयपंथी – 27 – 2
एकूण – 136611 – 61404 (44.95 टक्के)

सातारा (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 39397 – 24966
महिला – 19673 – 9455
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 59071 – 34421 (58.27 टक्के)

सांगली (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 57569 – 39549
महिला – 29661 – 17194
तृतीयपंथी – 3 – 0
एकूण – 87233 – 56743 (65.05 टक्के)

सोलापूर (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 42070 – 27285
महिला – 11742 – 6235
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 53813 – 33520 (62.29 टक्के)

कोल्हापूर (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 62709 – 45514
महिला – 26820 – 15448
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 89529 – 60962 (68.09 टक्के)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.