Pimpri: पुण्यातील दोन कोरोना बाधित रुग्णांचा वायसीएममध्ये मृत्यू

more covid19 patients from Pune but undergoing treatment for coronavirus in YCMH Pimpri died today. आजपर्यंत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू. 2

एमपीसी न्यूज – पुण्यातील रहिवासी पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय महिला आणि 38 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज (शुक्रवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी दोघांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, आजपर्यंत पुण्यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणा-या सात आणि शहरातील चार अशा 11जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातील रहिवासी असलेल्या या 60 वर्षीय महिला आणि 38 वर्षीय पुरुष रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि 24 एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात, भोसरीतील पुरुष रुग्णाचा 10 मे रोजी, 11 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाचा आणि आज 15 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या एक महिला आणि एक पुरुष अशा 11 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.