Chinchwad : संचारबंदीच्या काळात चार मेडिकल दुकाने फोडणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – संचारबंदी सुरू असताना दोन चोरट्यांनी मिळून चिंचवड परिसरातील चार मेडिकल दुकाने फोडली. या चोरट्यांनी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

सूर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (वय 25), ओम निवृत्ती कसबे (वय 21, दोघे रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस संचारबंदीच्या काळात वाल्हेकरवाडी येथे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी येथे दोन तरुण एका दुचाकीवरून संशयितरित्या येत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून दोघेही पळून जाऊ लागले. पोलिसांनी दोघांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली. तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेडिकल दुकानांमधील चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी सन्मती मेडिकल, महावीर मेडिकल या दुकानांचे शटर उचकटून चोरी केली. तर व्यंकटेश मेडिकल व रिव्हाइय मेडिकलमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन चोरट्यांकडून दोन हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.