Bhosari : पादचारी तरुणावर कोयत्याने वार; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणावर दोघांनी मिळून कोयत्याने वार केले. तसेच त्याला मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना गवळी माथा, भोसरी येथे रविवारी (दि. 1) रात्री पावणे दहा वाजता घडली.

रुपेश दिलीप बुजवडेकर (वय 19, रा. टेल्कोरोड, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर चौधरी (वय 25), शुभम सुतार (वय 25, दोघे रा. यशवंतनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी रुपेश हे मारुती मंदिरातून घरी पायी चालत जात होते. ते गवळी माथा येथील प्रशांत जनरल स्टोअर येथे आले असता आरोपी दुचाकीवरून आले. आरोपी शंकर याने ‘दुपारी माझ्या घरात कोण शिरले’ असे म्हणत कोयत्याने वार केले. आरोपी शुभम याने झटापटी करून मारहाण केली. यामध्ये रुपेश जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.